शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार दिवाळी बोनस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Diwali Bonus For Farmers: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारने रब्बी हंगाम यातील पिकाच्या एमएसपीत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार तर्फे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिवाळीसाठी बोनस दिले जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना तीन हजार रुपयांचे बोनस दिले जाणार आहे. त्याचबरोबर काही निवडक महिलांना आणि मुलींना 2500 रुपये देखील दिले जाणार आहेत. याचाच अर्थ राज्यातील अनेक पात्र महिलांना दिवाळीसाठी 5500 बोनस दिले जाणार आहे. अशातच केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने अनेक पिकांच्या एम एस पी मध्ये म्हणजेच किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना योग्य हमीभाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशभरातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. Diwali Bonus For Farmers

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्के निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आणखीन एक मोठा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकाच्या एमएसपीत वाढ करण्यात याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गहू पिकाच्या भावात प्रति क्विंटन 150 रुपये तर मोहरी पिकाच्या भावात तीनशे रुपयाची वाढ करण्याचा निर्णय आहे.

या पिकाचा वाढला MSP

केंद्र सरकारने 2025-26 या वर्षासाठी नवीन एम एस प निश्चित केला आहे. या निर्णयानुसार गावाच्या किमतीत प्रतिक्विंटल 150 रुपयांनी वाढ झाली आहे. आतापर्यंत हा दर 2275 रुपये एवढा होता. मोहरी वरील एम एस पी 300 रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे. मोहरीचे नवीन दर आता 5950 रुपये इतके झाले आहेत. याआधी मोहरीचे दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढे होते.

केंद्र सरकारने हरभऱ्याचा एमएसपी 210 रुपये प्रतिक्विंटल ने वाढवला आहे. त्यामुळे हरभराचा दर हा प्रतिक्विंटर 5650 रुपये इतका झाला आहे. या अगोदर फादर 5,440 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. मसुरी वरील एम एस पी प्रति क्विंटल 275 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी मसुरीचा दर 6425 रुपयावर होता त्यात वाढ होऊन 6700 प्रतिक्विंटल एवढा झाला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!