लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार ? अदिती तटकरे यांनी दिली माहिती नी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin scheme Aditi Tatkare : राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.परंतु महिलांमध्ये लाडक्या बहिणी योजनेचा सहवा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. शासनाच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही योजना थांबवली आहे. यामुळे त्या योजनेला स्थगिती मिळाल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू होणार का असा प्रश्न सध्या महिलांमध्ये निर्माण झालेला आहे. तर यावरती स्पष्टीकरण देत असताना मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. Ladki Bahin scheme Aditi Tatkare

निवडणुकीच्या संहिता लागल्यामुळे सरकारी कामावर अंकुश लागतो. आचार संहिता काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेल्या आहेत. त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून त्या योजनेसाठी लागणारा निधी थांबवलेला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेला आहे.

परंतु याबाबत बोलत असताना अदिती तटकरे यांनी 19 ऑक्टोबर रोजी रात्री ट्विटरवर पोस्ट करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असे स्पष्टपणे सांगितले आहे. यापुढे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून झालेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र बहिणींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे.

शासनाने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांचा लाभ आधीच महिलांच्या खात्यावरती जमा केलेला आहे. तसेच चार ते सहा ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे लाभ राज्यातील दोन कोटी चौतीस लाख पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे.

तसेच सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून यबाबत कोणतीही चुकीची माहिती महाराष्ट्रातील माता भगिनींना मिळू नये तसेच महिलांनी या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये असे देखील अदिती तटकरे म्हणाल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!