Cotton Rate: महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पादित होणारे पीक म्हणजे कापूस आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रात या पिकाला पांढरे सोने म्हणून देखील ओळखले जाते. महाराष्ट्रात कापूस पिकाची लागवड मराठवाडा विदर्भ आणि खानदेश सहित मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असतात.