राज्यातील या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस! IMD कडून यलो अलर्ट जारी..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Rain Alert: राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही दिवसापूर्वी पडलेला गारठा गायब झाला आहे. किमान तापमानात वाढ झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा IMD ने वर्तवला आहे.

👇👇👇

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व हवामानात दमटपणा निर्माण झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणारा दमट वारा थांबवत असून अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी भारतीय हवामान विभागाने राज्यातील नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

👇👇👇

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या भागात आज पावसाचा जोर काहीशा प्रमाणात वाढणार असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील वातावरणात दिसून येत आहे. येत्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा कुंकूवत होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. IMD Rain Alert

👇👇👇

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या भागात होणार जोरदार पाऊस

आज महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळीवारासोबत जोरदार मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रायगड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे व सातारा घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे.

👇👇👇

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य महाराष्ट्रात आज पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे सांगितले जात आहे.

अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “राज्यातील या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस! IMD कडून यलो अलर्ट जारी..”

Leave a Comment

error: Content is protected !!