UPI Transaction: सध्या भारतात अगदी चहा-वड्याच्या टपरीपासून ते मॉलमध्ये खरेदीपर्यंत सगळीकडे UPI चा धडाका आहे. “QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा” हे वाक्य आता आपल्याला कानाला चिकटलेलं आहे. अगदी शंभर रुपयांचं दूध घेतलं तरी लोक मोबाईल काढतात आणि ‘ट्यॅप’ करून पैसे देतात. या डिजिटल युगाने व्यवहार किती सोपे करून टाकलेत, नाही का?
पण आता जरा सावध व्हा! कारण येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून UPI वापरावर काही नवे नियम लागू होणार आहेत. यामुळे तुमचं बॅलन्स चेक करणं, ऑटो डेबिट व्यवहार आणि इतर गोष्टींवर थोडंसं नियंत्रण येणार आहे. चला तर मग, समजून घेऊया काय आहेत हे नवे नियम. UPI Transaction
NPCI चं नवं आदेश मध्ये काय बदल होणार?
UPI प्रणालीचं नियंत्रण पाहणारं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी काही नवीन सूचना दिल्या आहेत. यानुसार जर UPI सेवा पुरवणाऱ्या अॅप्सनी ह्या नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांच्यावर कारवाईही होऊ शकते.
१. API वापरावर मर्यादा: UPI वापरताना अनेक वेळा आपण बॅलन्स चेक करतो. यामुळे बँक सर्व्हरवर ताण येतो. त्यामुळे आता नवीन नियमांनुसार, फक्त ५० वेळा बॅलन्स चेक करण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे उगाचच वारंवार बॅलन्स पाहणं टाळावं लागेल.
२. व्यवहाराच्या वेळी थेट शिल्लक दाखवणं बंधनकारक: जेणेकरून ग्राहक पुन्हा वेगळं बॅलन्स पाहण्यासाठी API वापरू नये. यामुळे सिस्टमवरचा भार कमी होईल.
३. वेळेवर मर्यादा: सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 या वेळेत ग्राहकाच्या परवानगीशिवाय कोणताही API व्यवहार चालणार नाही. म्हणजे तुम्ही जर UPI अॅप चालवत असाल, तर ग्राहकाची संमती नसेल तर त्या वेळेत काहीच व्यवहार करता येणार नाही.
ऑटोपेमेंटवरही नियंत्रण
आजकाल अनेक जण नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिज्नी+ हॉटस्टारसाठी ऑटोपेमेंट चालू ठेवतात. पण कधी कधी बिनधास्तपणे पैसे कट होतात आणि कळतही नाही.
NPCI च्या नव्या नियमांनुसार,
- फक्त 1 ते 3 वेळाच ऑटोपेमेंट ट्राय करता येणार आहे.
- हे सुद्धा फक्त नॉन-पिक अवर्समध्ये म्हणजे ज्या वेळेस सर्व्हरवर ताण नसतो त्या वेळेतच हे व्यवहार होतील.
- यामुळे ग्राहकाला कोणतीही गोंधळ न होता व्यवस्थित माहिती मिळू शकेल आणि UPI प्रणालीही स्लो होणार नाही.